घनतमी चा केलेला इंग्रजी अनुवाद या संकेतस्थळावर पाहून कृतार्थ वाटलं. अनुवादाचे हे अल्पस्वल्प प्रयत्न हा मराठीच्या, संगीताच्या, काव्याच्या, तांब्यांच्या, मंगेशकरांच्या- कुणाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न आहे, माहित नाही- पण दरवेळी एखादा अनुवाद मूळ आशयाच्या जवळपास गेल्याचं समाधान मिळालं, की तो विचार कुठेतरी पोचेल, मराठीपलिकडच्या कुणातरी माझ्यासारख्या वेड्याला गाठेल ही आशा लागून राहते.... एकच- की हा एका जन्माचा व्यवहार नाही. हे जुनं काहीतरी फेडायचा प्रयत्न आहे नक्कीच.